Advertisement

सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासासाठी एक खिडकी योजना


सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासासाठी एक खिडकी योजना
SHARES

सोसायट्यांचा स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेच्या यशस्वीतेसाठी शासन मुंबई बँकेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


विकासासाठी नवीन डीसीआर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गृहनिर्माण सोसायट्यांचा स्वयंपुनर्विकास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात करण्यात आला. या योजनेअंतर्गत प्रस्ताव कसे तयार करावे व इतर बाबींची माहिती गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्हावी यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

तसेच नामांकित कन्स्ट्रक्शन कंपन्या व कॉन्ट्रक्टर यांचे पॅनल तयार करावं, त्यामुळे लोकांना विश्वासाने आपल्या संस्थेचे पुनर्विकासाचे काम देता येईल यासाठी शासनाने सन २००० नंतरच्या पात्र झोपडपट्टीधारकांना पुनर्विकासात घरं मिळावीत यासाठी क्रांतीकारक निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं. मुंबईच्या विकासासाठी नवीन डीसीआर करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


गृहनिर्माण संस्थांच्या विकासासाठी

या योजनेसाठी मुंबई बँकेच्यावतीने १० हजार कोटी रुपये उभे करण्यात येणार आहेत. तर मुंबई शहरातील गृहनिर्माण संस्थांच्या विकासासाठी हे सुवर्णमध्याचं पहिलं पाऊल ठरलं आहे. या योजनेसाठी ५० हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम उभी राहू शकेल, असा विश्वास बँकेचे संचालक आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा