Advertisement

आरबीआयची १४ बँकांवर कारवाई, कोट्यावधींचा दंड ठोठावला

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील १४ बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. यामध्ये स्टेट बँकेसह अनेक मोठ्या बँकांचा समावेश आहे.

आरबीआयची १४ बँकांवर कारवाई, कोट्यावधींचा दंड ठोठावला
SHARES

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील १४ बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. यामध्ये स्टेट बँकेसह अनेक मोठ्या बँकांचा समावेश आहे. आरबीआयने या बँकांना ५० हजार ते २ कोटींपर्यंत दंड ठोठावला आहे. 

एनबीएफसीला कर्ज देणे आणि एनबीएफसीकडून वित्तपुरवठा उपलब्ध करून घेणे यामध्ये या बँकांनी मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन केले आहे. याशिवाय ‘मोठ्या कर्जांच्या सेंट्रल रिपोजिटरीला सुचना देणारे परिपत्रक, छोट्या बँकिंग फायनान्स बँकाच्या संचालनाशी संबंधित मार्गदर्शक सूचना आणि बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम १९ (२) आणि कलम २० (१) चे उल्लंघन केल्याने या बँकांवर हा दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये खासगी, सरकारी, सहकारी, परदेशी आणि छोट्या वित्त बँकांचा समावेश आहे.

बँक ऑफ बडोदाला सर्वाधिक म्हणजे २ कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर बंधन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुईस एजी, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करुर वैश्य बँक, पंजाब अँड सिंध बँक, साउथ इंडियन बँक, जम्मू-काश्मीर बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा तर स्टेट बँक ऑफ इंडियाला ५० लाख रुपयांचा दंड आकारला आहे.



हेही वाचा - 

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता

इंधन दरवाढ सुरूच, पेट्रोल- डिझेल महागलं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा