Advertisement

कर्जे महागणार, अारबीयकडून रेपो दरात वाढ

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी रेपो दर ६ टक्क्यांवरून वाढवून ६.२५ टक्के केला अाहे. अारबीअायने रेपो दरात वाढ केल्यानं गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज महाग होणार अाहेत.

कर्जे महागणार, अारबीयकडून रेपो दरात वाढ
SHARES

रिझर्व्ह बँकेने ४ वर्षांच्या कालावधीनंतर बुधवारी पहिल्यांदाच रेपो दरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली. यामुळे अाता बँकांची सर्व प्रकारची कर्जे महागणार अाहेत. बुधवारी झालेल्या तीन दिवसीय अाढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी रेपो दर ६ टक्क्यांवरून वाढवून ६.२५ टक्के केला. अारबीअायने रेपो दरात वाढ केल्यानं गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज महाग होणार अाहेत.


कर्जावरील व्याज वाढणार

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात वाढ करण्याच्या निर्णयाअगोदर काही बँकांनी अापली कर्जे महाग केली अाहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मंगळवारी अापल्या एमसीएलअारमध्ये ०.०५ टक्के वाढ केली. हा दर ७ जूनपासून लागू होणार अाहे. याअगोदर एसबीअाय, पीएनबी अाणि अायसीअायसीअाय बँकेनेही अापले व्याजदर वाढवले अाहेत. अाता रेपो दर वाढीच्या निर्णयामुळे बँकांच्या कर्जावरील व्याज अाणखी वाढणार अाहे.


वाढत्या महागाईचं अाव्हान

वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळं व्याजदर वाढवण्यासाठी अारबीअायवर दबाव होता. त्यामुळं रेपो दर वाढवण्याचा निर्णय बँकेेनं घेतला. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणं हे अारबीअायसमोरील सर्वात मोठं अाव्हान अाहे. घाऊक महागाई दर सलग नोव्हेंबर २०१७ नंतर ४ टक्क्यांच्या वर राहिला अाहे. तर खाद्य पदार्थांचा महागाई दर ६ टक्के अाहे.

Advertisement


काय अाहे रेपो दर ?

रिझर्व्ह बँकेकडून देशातील बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर म्हणजे रेपो दर. रेपो दरात वाढ केल्याने बँकांना अारबीअायचे कर्ज महाग होते. त्यामुळे बँकांही ग्राहकांना देण्यात येणाऱ्या अापल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करतात. परिणामी बँकांची सर्व कर्जे महाग होतात.


हेही वाचा -

कंपन्यांना 'अच्छे दिन', बँकांनी केलं १ लाख कोटींचं कर्ज माफ

'आरबीआय'चं ग्राहकांना आवाहन, 'तीन दिवसांत करा तक्रार'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा