कोरोनाविरोधातील लढाईसाठी देशभरातील अनेक उद्योजक, सेलिब्रिटी, राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. त्यांनी कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या कर्मचाऱ्यांनी देखील यामध्ये आपलं योगदान दिलं आहे. एसबीआयच्या कर्मचाऱ्यांनी १०० कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
In the fight against #COVID19, around 2,56,000 employees of State Bank of India (SBI) have decided to contribute two days’ salary to the PM’s National Relief Fund. With this collective effort, Rs 100 crores will be donated to #PMCARES Fund: State Bank of India pic.twitter.com/fNnzEpfEE3
— ANI (@ANI) March 31, 2020
एसबीआयचे देशभरातील २ लाख ५६ हजार कर्मचारी आपला दोन दिवसांचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणाऱ्या मदत निधीतून पंतप्रधान सहाय्यता निधीला १०० कोटीची मदत होणार आहे.'
देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे करत कोट्यवधींची मदत केली आहे. रिलायन्स ग्रुपने ५०० कोटींची, टाटा ट्रस्टने ५०० कोटी मदत केली आहे.
हेही वाचा -