Advertisement

२ पॅन कार्ड असल्यास भरावा लागेल 'इतका' दंड

दोन पॅन कार्ड असणं मात्र महागात पडू शकतं. दोन पॅन कार्ड बाळगणाऱ्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

२ पॅन कार्ड असल्यास भरावा लागेल 'इतका' दंड
SHARES

कोणत्याही आर्थिक व्यवहारात पॅन कार्ड (pan card) अत्यंत महत्वाचं असतं. पॅन कार्ड आधार कार्डशी (Aadhar card) जोडणंही बंधनकारक आहे. प्रत्येक व्यक्तीकडं एकच पॅन कार्ड असतं. मात्र, काहींकडे दोन पॅन कार्ड असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दोन पॅन कार्ड असणं मात्र महागात पडू शकतं. दोन पॅन कार्ड बाळगणाऱ्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. 

दोन जण किंवा दोन कंपन्यांचे पॅन नंबर एकसारखे असू शकत नाहीत. मात्र, कोणाकडे दोन पॅन कार्ड  (pan card) सापडले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. याशिवाय त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाईल. पण अनेकांना हे पॅन कार्ड कसं परत करायची याची माहिती नसते. याची माहिती सर्वांना असणं आवश्यक आहे. 

असं करावं लागेल पॅन कार्ड परत

  • दुसरं पॅन कार्ड  (pan card) सरेंडर (Surrender) करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं अर्ज करता येतो. यासाठी एनएसडीएलची वेबसाइट किंवा एनएसडीएलच्या कार्यालयात जाऊन  Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data वर क्लिक करावं लागेल. हा फॉर्म भरून जमा करावा लागेल.
  • या फॉर्ममध्ये जे पॅन कार्ड (pan card) ठेवायचं असेल त्याचा उल्लेख सर्वात वर करावा. जे पॅनकार्डला रद्द करायचं आहे, त्याची कॉपी फॉर्मबरोबर जोडावी लागेल. 
  • काही लोक वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे पॅन कार्ड तयार करतात. डीमॅट खात्यासाठी वेगळा पॅन आणि इन्कम टॅक्सचं पेमेंट आणि रिटर्नसाठी वेगळं पॅन कार्ड तयार करतात. 
  • काही जण जुनं पॅन कार्ड हरवल्यानंतर नवं पॅन कार्ड तयार करतात. त्यामुळेही काही जणांकडे अनेक पॅन कार्ड असतात. 
  • डीमॅट खात्यासाठी आणि इन्कम टॅक्सचं पेमेंटसाठी वेगवेगळे पॅन दिलेले असल्यास एक पॅनकार्ड परत करावं लागणार आहे. या दोन्ही ठिकाणी एकच पॅन नंबर द्यावा लागणार आहे. दुसरं पॅन कार्ड परत करून आपल्या आधीच्या पॅन कार्डची माहिती पाठवून द्यावी. 


- कोणाकडे दोन पॅन कार्ड  (pan card) सापडले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. याशिवाय त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाईल.

- पॅन कार्ड आधार कार्डशी (Aadhar card) जोडणंही बंधनकारक आहे.

- डीमॅट खात्यासाठी आणि इन्कम टॅक्सचं पेमेंटसाठी वेगवेगळे पॅन दिलेले असल्यास एक पॅनकार्ड परत करावं लागणार आहे. 


हेही वाचा  -

सरकारी बँकांचा पुन्हा संप, 'या' ५ दिवशी कामकाज असेल ठप्प

मोदी सरकार घेऊन येतंय १ रुपयाची नवीन नोट

पॅन कार्ड आधार कार्डशी (Aadhar card) जोडणंही बंधनकारक आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा