Advertisement

आता NEFT ने २४ तासांत केव्हाही पाठवा पैसे!

रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत NEFT ची सेवा २४ तास उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ही सेवा येत्या डिसेंबरपासून उपलब्ध होईल.

आता NEFT ने २४ तासांत केव्हाही पाठवा पैसे!
SHARES

बँक ग्राहकांना आता एनईएफटी (national electronic fund transfer) च्या माध्यमातून २४ तासांमध्ये कुठल्याही वेळेत पैशांचं हस्तांतरण करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत NEFT ची सेवा २४ तास उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ही सेवा येत्या डिसेंबरपासून उपलब्ध होईल. 

सद्यस्थितीत वेळेची मर्यादा

सद्यस्थितीत आॅनलाइन पैसे हस्तांतरणासाठी RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट), NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) आणि IMPS (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) या ३ सेवा बँकांद्वारे पुरवल्या जातात.यापैकी NEFT आणि RTGS द्वारे पैसे हस्तांतरित करण्याची ठराविक वेळ आहे. तर  IMPS ने पैसे हस्तांतरित करायचे असल्यास त्याला वेळेची मर्यादा नाही.  

बँकेच्या कामकाजाच्या दिवशी

त्यानुसार NEFT ने सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेत पैसे हस्तांतरीत करता येतात. सोबतच दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसंच, प्रत्येक रविवारी ही सुविधा उपलब्ध नसते. म्हणजेच ही सेवा केवळ बँकेचं कामकाज सुरू असतानाच मिळते. त्यामुळे बँक ग्राहकांच्या सोयीसाठी RBI ने डिसेंबरपासून ही सेवा दररोज २४x७ तास उपलब्ध ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

रिटेल पेमेंटमध्ये क्रांती

यासंदर्भात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, एनईएफटी सुविधा २४ तास उपलब्ध झाल्यावर देशातील रिटेल पेमेंट सेवेत क्रांती होईल. 

एनईएफटीच्या माध्यमातून ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरीत करता येते. काही दिवसांपूर्वीच आरबीआयने NEFT आणि RTGS या सेवेच्या वापरावरील सेवाशुल्क रद्द केले आहेत. 



हेही वाचा-

कर्जधारकांना खूशखबर! आरबीआयने केली व्याजदारांत ०.३५ टक्क्यांची कपात

कलम ३७० चा परिणाम शेअर बाजारावर, सेन्सेक्स, निफ्टी कोसळले



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा