पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह (pmc) बँक घोटाळ्यामध्ये अनेक कुंटुंबं एका रात्रीत रस्त्यावर आली. यामध्ये नूपुर अलंकार या टिव्ही अभिनेत्रीचाही समावेश आहे. नुपूर यांचं पीएमसी बँकेत खातं आहे. बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आल्याने अक्षरक्ष त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. खर्च भागवण्यासाठी त्यांना आपले दागिने विकावे लागले आहेत. या पैशातून आता त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.
बँक खात्यातून पैसे काढता येत नसल्याने त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीत. दागिने विकण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. एका सहकारी अभिनेत्याकडून ३ हजार रुपये घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एकाने येण्या-जाण्यासाठी त्यांना ५०० रुपये ट्रान्सफर केले. आतापर्यंत मित्रांकडून ५० हजार रुपये उधारी घेतल्याचं नुपूर यांनी सांगितलं. आमचा पैसा बुडणार तर नाही ना अशी भिती नुपूर यांनी व्यक्त केली आहे.
सद्या खूप आर्थिक अडचणीतून जात असल्याचं नुपूर यांनी म्हटलं आहे. त्यांनी काही दिवसांपुर्वीच दुसऱ्या बँकेतील पैसे पीएमसीमध्ये ट्रान्सफर केले. बँकेबाबत असं काही होणार आहे हे माहीत असतं तर पैसे ट्रान्सफरच नसते केले, असं नुपूर यांनी सांगितलं.
हेही वाचा -
PMC बँक घोटाळा: निलंबीत व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक