Advertisement

एक व्हिडिओ कॉल आणि UBER चे ३७०० कर्मचारी जॉबलेस

UBER नं त्यांच्या १४ टक्के म्हणजे एकूण ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.

एक व्हिडिओ कॉल आणि UBER चे ३७०० कर्मचारी जॉबलेस
SHARES

जगभरात कोरोनाचा (Coronavirus Update) हाहाकार माजला आहे. जगभरात कोरोनाचे संकट थांबण्याचं नाव घेत नाही आहे. उलट हा धोका वाढत चालला आहे. परिणामी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) जागतिक स्तरावर अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.

याचाच परिणाम म्हणजे अनेक कंपन्या त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या खर्चात कपात करत आहेत. त्याकरता विविध कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात सुरू केली आहे. तर काही कंपन्यांनी नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. यामध्ये आता ऑनलाइन टॅक्सी सेवा देणाऱ्या UBER चा देखील समावेश झाला आहे. UBER नं त्यांच्या १४ टक्के म्हणजे एकूण ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.

उबरनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना केवळ ३ मिनिटांच्या व्हिडीओ कॉलवर ही माहिती दिली. त्यांच्या कर्मचाऱ्यांना झूम व्हिडीओ कॉल (Zoom Video Call) करून कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची माहिती दिली. उबरनं सांगितलं की, आम्ही ३ हजार ७०० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहोत. 'तुमचं काम प्रभावित झाल्यामुळे आज तुमचा उबरबरोबर काम करण्याचा शेवटचा दिवस आहे', असं या कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सांगण्यात आलं. कर्मचाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचारी म्हणाले की, कंपनीनं आधी नोटीस देणं आवश्यक होतं. अचानक ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण योग्य नाही.

मिळालेल्या माहितीनुसार काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना काही रक्कम देण्यात आली आहे. उबरला चालू आर्थिक वर्षात २.९ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. कंपनीनं त्यांच्या बाइक आणि स्कूटरचा व्यवसाय देखील बंद केला आहे.



हेही वाचा

कोरोनाशी लढा देण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून भारताला १ अब्ज डाॅलर

आयटी रिटर्न भरण्यासाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा