Advertisement

१२५ रुपयांचं नाणं लवकरच बाजारात


१२५ रुपयांचं नाणं लवकरच बाजारात
SHARES

१२५ रुपयांचं नाणं लवकरच बाजारात दाखल होणार अाहे. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू शुक्रवारी २९ जून रोजी अर्थतज्ज्ञ पी. सी. महालनोबीस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ १२५ रुपयांचं अाणि ५ रुपयांचं नवं नाणं जारी करणार अाहेत.


प्रथमच नाणं चलनात

महालनोबीस जयंती ही सांख्यिकी दिवस म्हणून साजरी केली जाते. सरकारने काही महिन्यांपूर्वी ५०० अाणि १ हजार रुपयांच्या नोटांची डिझाइन बदलली अाहेत. त्यानंतर अाता सरकार बाजारात नवीन नाणी अाणणार अाहे. लवकरत बाजारात १२५ रुपयांचं नाणं मिळेल. प्रथमत भारतात १२५ रुपयांचं नाणं चलनात येणार अाहे. सध्या देशात १० रुपयांचं नाणं हे नाण्यांमध्ये सर्वाधिक किंमतीचं अाहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अाणि भारतीय सांख्यिकी संस्था यांनी सांख्यिकी दिवस साजरा करण्यासाठी २९ जून रोजी कोलकाता येथे कार्यक्रम आयोजित केला अाहे.



हेही वाचा -

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून ५ जणांचा मृत्यू

यूजीसी गाशा गुंडाळून नवीन आयोग येणार



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा