कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी भारताला जागतिक बँकेकडून १०० कोटी डॉलरचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कोरोनासाठी अत्यावश्यक असणारे किट तसेच कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील शोध मोहिमेसाठी हा निधी वापरता येणार आहे. जागतिक बँकेने केलेल्या मदतीमुळे नवीन कक्ष तसेच लॅबोरेटरीसाठी भारताला सध्या आवश्यक असलेल्या पैशांची गरज पूर्ण होणार आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी कोरोनाशी सामना करण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे.
कोरोना विषाणूने देशात आतापर्यंत ५३ जणांचा जीव गेला आहे. 2 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून देशातील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. केंद्र सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.
केंद्र सरकारने यावर उपाय योजना करत काही घोषणा केल्या. लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मोदींनी पीएम केअर्स फंडात आर्थिक मदत करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. देशातील नामांकित कंपन्या आणि सामान्य जनतेपासून ते उद्योगपती आणि प्रसिद्ध व्यक्त सढळ हाताने मदत करताना पाहायला मिळत आहे. जागतिक बँकेनेही भारताला मदत दिली असून ही मदत भारतासाठी खूपच मोलाची ठरेल.
हेही वाचा -
मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद