विरार (virar) पश्चिमेतील अर्नाळा (aranala)किल्ल्याजवळ 30 फूट लांब व्हेल (whale) माशाचा मृतदेह सोमवारी किनाऱ्यावर वाहून आला. संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही ते व्हेल माशाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपकरणे घेऊन घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याचे, मिड-डेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये व्हेल माशाचा मृतदेह समुद्रकिनारी पडलेला दिसत आहे. विरारमधील अर्नाळा किल्ला गावापासून अंदाजे 700 मीटर अंतरावर, किल्ल्याच्या उत्तरेला, चॅनेल गेटजवळ मृतदेह आढळून आला. विरारमधील अर्नाळा किल्ल्याजवळ किना-यावर वाहून गेलेला 30 फूट लांबीचा व्हेलचा मृतदेह साधारण एक टन वजनाचा आहे.
एका स्थानिक सूत्राने मिड-डेला सांगितले की, सोमवारी भरतीमुळे मृत व्हेल किना-यावर वाहून आला. आता व्हेलचा मृतहेद समुद्र किनाऱ्यावर अडकला आहे. जिथून व्हेलला हलवणे आणि त्याची विल्हेवाट लावणे अधिकाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे.
स्थानिक मच्छिमारांना शंका आहे की, व्हेल खोल समुद्रात बहु-डेक क्रूझ जहाजामुळे जखमी झाला असावा किंवा समुद्राच्या प्रदूषणाला बळी पडला असावा. वैद्यकीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण ठरवता येईल. तथापि, सोमवारपासून हे शव किनाऱ्यावर होते. स्थानिक रहिवासी व्हेल पाहण्यासाठी ग्रामस्थांना आकर्षित करत होते,” वसई तालुक्यातील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (MMB) च्या एका सूत्राने अहवालानुसार सांगितले.
एका स्थानिकाने सांगितले की, वन आणि महसूल अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. मृतदेहासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असलेल्या स्थानिक रहिवाशांना स्फोटाच्या धोक्यामुळे अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला.
अर्नाळा (arnala) किल्ल्याजवळ व्हेलच्या मृतदेहाबाबत विभागाला सूचित करण्यात आल्याचे वन अधिकाऱ्याने सांगितले. 30 फूट लांबीमुळे, त्याची योग्य विल्हेवाट लावता येईल अशा ठिकाणी हलवण्यासाठी मोठ्या बोटींचा वापर केला जाईल.
सप्टेंबर 2021 मध्ये अशाच एका घटनेत वसईतील (vasai road) भुईगाव समुद्रकिनाऱ्याजवळ व्हेल माशाचा मृतदेह सापडला होता. अधिकाऱ्यांना त्या व्हेल माशाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन उत्खनन यंत्रांचा वापर केला होता.
हेही वाचा