Advertisement

आलिया भट्टविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं तिला सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता.

आलिया भट्टविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश
SHARES

अभिनेत्री आलिया भट्टदेखील करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. याच पार्टीतील करिना आणि करिष्मा कपूरसह चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं तिला ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता.

पण ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज होण्यापूर्वी दिल्लीतील गुरुद्वारला आलियानं भेट दिली. त्यामुळे होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आलिया भट्टविरोधात मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

मुबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष राजुल पटेल म्हणाले, आलिया भट्ट नियमांचं उल्लंघन करत दिल्लीला गेली. दिल्लीतील फोटोदेखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे आलियाला आता धडा शिकवण्याची गरज आहे. ती एक सेलिब्रिटी असल्यामुळे तिला हे समजले पाहिजे की बरेच लोक तिला फॉलो करतात. एक जबाबदार नागरिक म्हणून आलियानं नियमांचं उल्लंघन करू नये.

बुधवारी रात्री चार्टड विमानानं आलिया भट्ट मुंबईत दाखल झाली. हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात आलिया भट्ट आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं तिला सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये रहाण्याचा सल्ला दिला होता.

त्यानंतर पाच दिवसांतच आलिया दिल्लीत पोहोचली. आलियानं एका दिवसाच्या कामाकरता होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केलं. दरम्यान आपण एका दिवसाच्या कामाकरिता दिल्लीला जात असून आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं आलियानं पालिकेला कळवलं होतं.



हेही वाचा

सलमान खान कुटुंबीयं चिंतेत, घरातील छोटा सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह

करण जोहर म्हणाला, "८ लोकांच्या एकत्रित येण्याला पार्टी म्हणत नाही"

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा