Advertisement

घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामावर एनएमएमसीची कारवाई

मागील काही दिवसांपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा पालिकेने उगारला आहे.

घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामावर एनएमएमसीची कारवाई
SHARES

मागील काही दिवसांपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा पालिकेने उगारला आहे. मंगळवारी घणसोली विभाग कार्यक्षेत्रामधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. 

घणसोली विभागातील जिजामाता नगर, घणसोली गांव येथे नवी मुंबई महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामास घणसोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. नोटिशीस अनुसरून संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. मात्र, संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.

 या अनधिकृत बांधकामाविरोधात घणसोली विभागामार्फत धडक मोहीम आयोजित करीत हे बांधकाम तोडण्यात आले. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर ११, ब्रेकर ३, गॅस कटर १ तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते. 

संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामविरोधी मोहीमा अधिक तीव्र स्वरूपात राबविण्यात येणार आहेत. याआधी, बेलापूर ऐरोली व घणसोली कार्यक्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली होती. 

बेलापूर गावातील सेक्टर २० मधील लक्ष्मण तुकाराम भोईर आणि  सत्यवान सावळाराम म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगपालिकेची कोणतेही पुर्वपरवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम सुरु केलं होतं. हे बांधकाम पालिकेने तोडलं आहे. 

याशिवाय ऐरोली विभागातील सेक्टर ३ मध्ये भूखंड क्रमांक जे-२६७, जे-२७७, जी-१३१ व डी-४ याठिकाणी तळमजला + २ मजली इमारतीचं बांधकाम तोडण्यात आलं. तसंच घणसोली विभागातील ‍शिवाजी तलाव परीसर, घणसोली गाव येथे आरसीसी तळमजला कॉलमचे बांधकाम महापालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू  होते. या बांधकामावरही पालिकेने कारवाई केली आहे. 



हेही वाचा -

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  1. महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा