मराठी मतदारांना आकर्षित करण्याच्या आणखी एक प्रयत्न भाजपा तर्फे करण्यात येत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण भाजपच्या शहर युनिटने बुधवारी गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या घरावर गुढी उभारणार आहेत. जवळपास एक लाख गुढी उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
हिंदू दिनदर्शिकेनुसार साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मुंबई भाजपच्या वतीने मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार असून, त्यामध्ये भाजप कार्यकर्ते घरोघरी सुमारे एक लाख गुढी उभारून या हिंदू नववर्षाचे स्वागत करतील, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवारी दिली.
9,800 निवडणूक बूथपैकी प्रत्येकी 11 कार्यकर्ते गुढी उभारून नवीन वर्ष मोठ्या थाटात साजरे करतील. पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि हे उत्सव मतदारांना आकर्षित करतील अशी अपेक्षा आहे.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हिंदू सण उत्साहात साजरे केले जात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री, दीपावली आणि शिवजयंती या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवाजी पार्क येथील जाणता राजा या मेगा ड्रामालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लालबाग, परळ, वरळी, विलेपार्ले, बोरिवली आणि दहिसरसह अनेक भागात मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
हेही वाचा