Advertisement

मुंबईत ४९९ इमारती धोकादायक, पालिकेनं जाहीर केली यादी

यंदाही महापालिकेनं धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये तब्बल ४९९ इमारती धोकादायक आहेत.

मुंबईत ४९९ इमारती धोकादायक, पालिकेनं जाहीर केली यादी
SHARES

मुंबईत दरवर्षी जास्तीचा पाऊस पडल्यावर अनेक ठिकाणी संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळं पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यादरम्यान महापालिका मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. त्यानुसार, यंदाही महापालिकेनं यादी जाहीर केली असून, मुंबईत तब्बल ४९९ इमारती धोकादायक आहेत.  

पावसाळ्यात मोठा धोका

या धोकादायक इमारतीमधील फक्त ६८ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तसंच, जवळपास ३९० इमारतींमधील रहिवाशांना पावसाळ्यात मोठा धोका आहे. अतिधोकादायक इमारतींपैकी एकही इमारत पाडण्यात आलेली नाहीत. ५४ धोकादायक इमारती रहिवाशांनी कोणतीही हरकत न घेता रिकाम्या केल्या आहेत, तर १४ इमारती रहिवाशांनी रिकाम्या केल्या आहेत. परंतु, या इमारती तोडण्याची परवानगी न्यायालयानं दिलेली नाही. १७४ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. ६५ इमारतींचं पाणी आणि वीज महापालिकेनं कापलं आहे. तरीही रहिवाशी त्या इमारतींमध्ये राहत आहेत

जागांना चांगला भाव

मुंबईत अनेक जागांना चांगला भाव असल्यानं याठिकाणाहून दुसरीकडे गेल्यास पुन्हा या ठिकाणी येता येणार नाही. त्याशिवाय, न्यायाप्रविष्ट प्रकरणं, जुन्या इमारतींचे वाद, विकासकांकडून केली जाणारी अडवणूक, फसवणूक आणि ट्रान्झिस्ट कॅम्पचा सामान्यांनी घेतलेला धसका या कारणांमुळं इमारत कितीही धोकादायक झाली असली तरी रहिवासी जागा सोडून जात नाहीत.

Advertisement



हेही वाचा -

केंद्रीय अर्थसंकल्पमधील ठळक मुद्दे

केंद्रीय अर्थसंकल्पः पेट्रोल, डिझेल, सोने महागणार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा