Advertisement

हाऊसिंग सोसायट्यांमध्येही ‘पे अॅण्ड पार्क’? महापालिका आयुक्तांनी दिले आदेश


हाऊसिंग सोसायट्यांमध्येही ‘पे अॅण्ड पार्क’? महापालिका आयुक्तांनी दिले आदेश
SHARES

मुंबईतील रस्त्यांवर सद्यस्थितीत वाहनांची संख्या जास्त आणि वाहनतळांची संख्या कमी अशी परिस्थिती आहे. त्यातच महापालिकेचं अधिकृत वाहनतळ असलेल्या ठिकाणापासून १५० मीटर अंतरावर गाडी अनधिकृतरित्या पार्क केल्यास वाहनधारकाला जबर दंड ठोठावला जात आहे. त्यामुळे गाड्या पार्क करायच्या कुठे? खासकरून कामांच्या तासांत, असा प्रश्न मुंबईतील नोकरदारांना सतावू लागला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी सार्वजनिक पार्किंग सुरू करता येईल, अशा महापालिका हद्दीतील प्रत्येक वाॅर्डात ५ सहकारी गृहनिर्माण संस्था निवडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

'असं' असेल नियोजन 

महापालिकेच्या नियोजनानुसार, सकाळच्या वेळेत एखाद्या गृहनिर्माण संस्थेतील रहिवासी आपली गाडी घेऊन कामासाठी बाहेर पडल्यावर ती जागा दिवसभर रिकामीच असते. ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आपल्याकडील ही रिकामी जागा सार्वजनिक पार्किंगसाठी उपलब्ध करून देतील. तिथं 'पे अॅण्ड पार्क' सुरू केलं जाईल. त्यातून मिळणारं उत्पन्न गृहनिर्माण संस्थेलाच द्यायचं. जेणेकरून संस्थेच्या उत्पन्नातही भर पडेल. त्यानुसार प्रत्येक वाॅर्डात ५ सहकारी संस्था निवडण्याचे आदेश परदेशी यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत. 

योजना अयशस्वी

यासंदर्भात महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, या आधीही वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत अशा गृहनिर्माण संस्था निवडण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु संस्थेतील रहिवाशांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याने या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. अनोळखी व्यक्तीला आपली जागा गाडी पार्क करायला कशी उपलब्ध करून द्यायची, असा त्यांचा प्रश्न होता.



हेही वाचा- 

महापौरांनीच तोडला वाहतूक नियम, दंडवसुली कधी?

जी नॉर्थ विभागात 'नो पार्किंग'मध्ये पालिकेच्याच गाड्या पार्क



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा