न्यू ट्रांझिट कॅम्प (New Transit Camp) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ नगर झोपडपट्टीतून जाणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. ज्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवला जात आहे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि निर्जंतुकीकरण केल्याच्या महापालिकेच्या दाव्यांचा काँग्रेसने पर्दाफाश केला आहे. कॉंग्रेसचे (Congress)माजी विरोधी पक्ष सदस्य रवि राजा (Ravi Raja) यांनी प्रशासकीय संस्थेने केलेल्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विशेषत: वडाळ्यातील (Wadala) कोकरी आगर येथील नाल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
तसेच न्यू ट्रांझिट कॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ नगर (Siddharth Nagar)झोपडपट्टीतून जाणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. ज्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबतो. तसेच साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी येते. तसेच आजार पसरतात.
नाल्यात साचलेला कचरा उपसा अधिक सक्षमपणे होत नाही, वरवरची साफसफाई केली जाते, असे रवि राजा म्हणाले. त्यामुळे गटारीचे पाणी अजिबात वाहत नाही. आता तर कचऱ्याची पातळी बऱ्यापैकी वर आली आहे. जर जोरदार पाऊस पडला तर गटाराचे सर्व पाणी आसपासच्या परिसरात पसरेल.” असे मत परिसरातील अनेक रहिवाशांनी व्यक्त केले.
तसेच नाल्यातून येणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरते, याशिवाय या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. झोपडपट्टीतून जाणारा रस्ता कच्चा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणेरडे पाणी आणि चिखल साचला आहे.
तसेच चुनाभट्टीतील (Chuna Bhatti) सोमय्या नाला आणि मानखुर्दमधील (Mankhurd) रेल्वे रुळांजवळील नाल्यांसह इतरही अनेक नाल्यांची अशीच अवस्था आहे.
हेही वाचा