कुपरेज मैदानात घोड्यावरून पडून ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर या मैदानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने 'कारणे दाखवा नोटीस' बजावली आहे.
या मैदानाच्या देखभालीचं कंत्राट 'ऑपेरा इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला २०१५ मध्ये ३ वर्षांसाठी देण्यात आलं होतं.
मात्र, २०१५ मध्येच न्यायालयाच्या आदेशानुसार या मैदानात घोडा चालवण्यास बंदी घातली होती. परंतु त्यानंतरही याठिकाणी घोडे फिरवले जात होते.
त्यामुळे हे घोडे कुणाच्या आदेशानुसार फिरवले जात होते, तसेच ही बाब उद्यान विभागाच्या लक्षात आणून का दिली नाही? याबाबत महापालिकेच्या 'ए' विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी संबंधित कंत्राटदार कंपनीला 'कारणे दाखवा नोटीस' बजावली आहे. या नोटीसला त्वरीत उत्तर देण्यात यावं, अन्यथा कंत्राट रद्द करण्यात येईल, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा-
'बाजीराव'ची होणार वैद्यकीय चाचणी!