Advertisement

मुंबईतील २९ पूल धोकादायक, १२ पुलांचा वापर पूर्णपणे बंद

मुंबई महापालिकेनं सुरू केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आतापर्यंत २९ पूल धोकादायक असल्याचं आढळून आले आहेत. या धोकादायक पुलांमधील ८ पूल पाडण्यात आले असून, १२ पुलांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

मुंबईतील २९ पूल धोकादायक, १२ पुलांचा वापर पूर्णपणे बंद
SHARES

मुंबई महापालिकेनं सुरू केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आतापर्यंत २९ पूल धोकादायक असल्याचं आढळून आले आहेत. या धोकादायक पुलांमधील ८ पूल पाडण्यात आले असून, १२ पुलांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसंच, उर्वरीत ९ पूल तातडीनं बंद करण्यात येणार आहेत. या सर्व २९ ठिकाणी नवे पूल उभारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. मात्र, या कामामुळं रहिवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

३०४ पुलांचं ऑडिट

महापालिकेच्या अखत्यारीत एकूण ३४४ पूल असून यामधील ३०४ पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. यामधील आतापर्यंत धोकादायक आढळलेल्या २९ पुलांमधील ८ अतिधोकादायक पूल याआधीच पाडण्यात आले आहेत. तर १२ धोकादायक पूल वापरासाठी बंद करण्यात आले आहेत. त्याशिवाय, शिल्लक ९ अतिधोकादायक पूल लवकरच पाडण्यात येणार आहेत. यामध्ये पादचारी पुलांसह वाहतूक पुलांचाही समावेश आहे.

पूल वाहतुकीसाठी बंद

धोकादायक आढळलेल्या २९ पुलांपैकी ३ पुलांसाठी याआधीच कार्यादेश देण्यात आले असून उर्वरित ७ पूलांबाबत स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसंच, ५ पुलांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणं, धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्यामुळं रहिवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचं काम महापालिकेकडून सुरू आहे.



हेही वाचा -

रमजान ईदनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या

'तिनं' टाकाऊ जिन्सपासून बनवल्या टिकाऊ बॅग्स


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा