Advertisement

CSMTतील सबवेमध्ये आधुनिक व्हेंटिलेशन यंत्रणा

यामुळे सबवेमधील वातावरण चांगले राहिल तसेच प्रवाशांसाठी आरामदायी ठरेल.

CSMTतील सबवेमध्ये आधुनिक व्हेंटिलेशन यंत्रणा
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातील (CSMT) सबवेमध्ये आधुनिक व्हेंटिलेशन यंत्रणा बसवली आहे. ही यंत्रणा तापमान नियंत्रित ठेवते तसेच हवेची गुणवत्ता सुधारते. 

यामुळे सबवेमधील (subway) वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होईल. याचा फायदा प्रवाशांना होईल. 

या यंत्रणेची वैशिष्ट्ये

  1. या यंत्रणेमुळे वेंटिलेशन चांगले होते. 

  2. हवा खेळती ठेवण्यासाठी दोन उच्च क्षमतेचे पंखे आणि नऊ जेट पंखे जोडण्यात आले आहेत.

  3. हे पंखे हवा शुद्ध करण्याचे काम करतात.

  4. या पंख्यांमुळे गर्दीच्या वेळेस सबवेमधील वातावरण थंड राहते.

  5. वेंटिलेशन सिस्टमची रचना टनेल वेंटिलेशन तंत्रज्ञानाद्वारे प्रेरित आहे.

या यंत्रणेला सुरक्षेच्या दृष्टीनेही तयार करण्यात आले आहे.

  1. आगीच्या घटनांमध्ये ही यंत्रणा अधिक कार्यक्षमतेसह दुप्पट वेगाने काम करते.

  2. आग लागल्यानंतर ही यंत्रणा धूराचे लोट कमी करुन परिस्थिती आटोक्यात आणते. 

हा भुयारी मार्ग 1999 ला उघडण्यात आला. हा सबवे 3000 चौ.मी लांबीचा आहे. हा सबवे मध्य रेल्वे (central railway) आणि हार्बर रेल्वे (harbour) मार्गाला डी.एन.मार्ग आणि महापालिका मार्गाशी जोडतो.

या सबवेवर अस्वच्छता, अंधार, अशुद्ध हवा, दुर्गंधी आणि गर्दीमुळे टीकेची झोड उठत होती. त्यामुळे ही यंत्रणा आता फायदेशीर ठरणार आहे.



हेही वाचा

ठाणे जिल्ह्यात नोटाला 'इतके' मतदान

वांद्रेत मुंबईचे पहिले ओपन-एअर ट्रेन कोच रेस्टॉरंट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा