Advertisement

दराडे कुटुंबांनी अडवलेला बंगला महापालिका परत घेणार, गटनेत्यांच्या सभेत निर्णय

मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या निवासस्थानाचा शोध सुरू असतानाच दराडे कुटुंबांनी अडवलेला हा बंगला महापालिकेनं ताब्यात घ्यावा असा निर्णय गटनेत्यांच्या सभेत घेण्यात आला आहे.

दराडे कुटुंबांनी अडवलेला बंगला महापालिका परत घेणार, गटनेत्यांच्या सभेत निर्णय
SHARES

मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या निवासस्थानाचा शोध सुरू असतानाच सनदी अधिकारी प्रवीण दराडे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे यांनी मलबार हिलमधील महापालिकेचा बंगला अडवल्याने गटनेत्यांच्या सभेत तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे दराडे कुटुंबांनी अडवलेला हा बंगला महापालिकेनं ताब्यात घ्यावा असा निर्णय गटनेत्यांच्या सभेत घेण्यात आला आहे.


पर्यायी निवासस्थानाचा शोध सुरूच

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौरांच्या निवासस्थानाची जागा देण्यात आल्यामुळे महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाचा शोध सुरु आहे. महापौरांच्या निवासस्थानासाठी भायखळा राणीबागेतील बंगला सुचवण्यात आला असला तरी हा बंगला घेण्यास महापौरांसह सभागृहनेत्यांनी विरोध दर्शवला आहे.


सेवानिवृत्त होईपर्यंत

महापौरांचं निवासस्थान हे मलबार हिलमधील बंगल्यात करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु महापौरांच्या निवासस्थानासाठी मागणी होत असलेल्या निवासस्थानात एमएमआरएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पल्लवी दराडे हे राहत असून शासनाने त्यांना हा बंगला सेवानिवृत्त होईपर्यंत दिला आहे.


बंगला परत घेण्याचा प्रस्ताव

महापालिकेचा हा बंगला शासकीय अधिकाऱ्याने अडवल्यामुळे तो परत घेण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे आला असताना सर्वच सदस्यांनी तो बंगला ताब्यात घेण्याची मागणी केली. यावर भाजपाचे मनोज कोटक यांनी, महापौर आणि आयुक्त यांनी सरकारकडे जाऊन हा बंगला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना केली. यावर आयुक्तांनीही हा बंगला प्रशासन म्हणून ताब्यात घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यानुसार, महापौरांनी हा बंगला ताब्यात घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.



हेही वाचा-

…म्हणून दराडे कुटुंबाने अडवला महापालिकेचा बंगला

महापौर बंगल्याचा वाद: 'यापुढे दराडेंना नोटीस पाठवाल तर बघा', राज्यसरकारने महापालिकेला खडसावलं


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा