रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. धुके व तांत्रिक कारणामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मध्य रेल्वेच्या सीएसटीकडे जाणाऱ्या धिम्या व जलद मार्गावरील गाड्यांवर परिणाम झाला आहे. गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.
सकाळच्या वेळी नोकरदार मंडळी कार्यालय गाठण्याच्या घाईत असताना गाड्या उशीराने धावत असल्यानं रेल्वे खचाखच भरुन धावत आहेत. फलाटांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
गुरूवारी सकाळी मुंबई उपनगर परिसरात दाट धुके पसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.