Advertisement

चांगल्या नाही तर खराब रस्त्यांची डागडुजी करण्याची नागरिकांची विनंती

कुलाब्यातील रहिवाशांनी बीएमसीला खराब रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

चांगल्या नाही तर खराब रस्त्यांची डागडुजी करण्याची नागरिकांची विनंती
SHARES

माजी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाब्यातील रहिवाशांनी बीएमसीला रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याची विनंती केली आहे. खराब स्थितीत असलेल्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पहिले व्हावे. चांगल्या स्थितीतील रस्ते उगाच खराब करून नयेत. 

ए-वॉर्डमधील  हेन्री मार्ग, टिळक मार्ग, गार्डन रोड आणि वॉल्टन रोड या 4 मार्गांवर सिमेंट काँक्रीटीकर करू नये अशी विनंती नागरिकांनी केली आहे. कारण हे रस्ते समाधानकारक स्थितीत आहेत आणि त्यांना पुनर्बांधणीची आवश्यकता नाही.

भाजपचे माजी नगरसेवक मकरन नार्वेकर यांनी याबाबच चिंता व्यक्त केली आहे.

पालिका प्रमुख भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात, नार्वेकर यांनी शहरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांबद्दल चिंता व्यक्त केलीय यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष वाढत आहे, असे देखील त्यांनी व्यक्त केले. 

"मुंबईतील नागरिक मागणी करत आहेत की, बीएमसीने अनावश्यक असे सुव्यवस्थित रस्ते खोदण्याऐवजी खराब स्थितीत असलेले रस्ते दुरुस्त करण्यावर लक्ष केंद्रित करावे," असे त्यांनी सांगितले.

नार्वेकर यांनी प्रस्तावित काँक्रीटीकरणाबाबत वांद्रे येथील माउंट मेरी रोड आणि मरीन ड्राइव्हमधील डी रोड येथील रहिवाशांच्या विरोधाचा विशेषतः उल्लेख केला. नार्वेकर यांनी गगराणी यांना अर्थसंकल्पीय पत्रकार परिषदेत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. जिथे असे म्हटले होते की, लेखी अभिप्राय मिळाल्यानंतर बीएमसी रस्ते प्रकल्पांचा आढावा घेईल.



हेही वाचा

महिला बचत गटांसाठी 10 उमेद मॉल्स उभारण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री

विमानतळाजवळील अतिक्रमण न हटवल्याने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा माफीनामा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा