नरिमन पॉइंट - गेल्या 23 महिन्यांचा वेतन थकवल्याने महापालिकेच्या सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी थेट मंत्रालय गाठले. थकबाकी वेतन मिळावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जवळपास 750 सफाई कर्मचारी मंत्रालयाच्या बाहेर जमले होते. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना मदत केली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.