कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमावर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. के.ई.एम रुग्णालयात देखील कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत. परंतु, या रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीकांचा जीव धोक्यात असल्याची माहिती समोर येत आहे. या रुग्णालयातील परिचारीकांनी सोमवारी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.
केईएमच्या कर्मचारी असलेल्या कोरोनाबाधित परिचारिकांवर रुग्णालयातच उपचाराची व्यवस्था करावी, अशी मागणी परिचारिका गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. मात्र, रुग्णालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने याच्या निषेधार्थ त्यांनी कोरोनाबाधिक परिचारिकेसह आंदोलन पुकारलं. केईएम रुग्णालयातील ४५ परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, KEM रुग्णालयात काम बंद आंदोलन
या परिचारिकांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात व्यवस्था नाही. त्यांना महात्मा गांधी रुग्णालय किंवा सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठविलं जात आहे. त्यांच्यावर केईएममध्येच उपचार व्हावेत, अशी मागणी परिचारिकांनी केली होती. सातत्यानं मागणी करूनही त्याकडं रुग्णालय प्रशासनानं दुर्लक्ष केल्याने परिचारिकांनी कोरोनाची लागण झालेल्या परिचरिकेला घेऊन रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या वेळी परिचारिकांच्या उपचारासाठी वेगळा कक्ष बनविण्याचं आश्वासन अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी दिले.
हेही वाचा - महाराष्ट्रातून ८२२ विशेष श्रमिक ट्रेनमधून 'इतके' लाख परप्रांतीय कामगार परतले
याआधी रुग्णालयातील कोरोनाच्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळं केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. सर्व संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. या आंदोलनानंतर कर्मचाऱ्यांचं हे दुसरं आंदोलन आहे. दरम्यान, केइएम रुग्णालाच्या शवागृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव ही धोक्यात आहे. शवागृहात अनेक मृतदेह पडून असल्याची बातमी याआधीच समोर आली होती.
हेही वाचा -
धारावीतील २०० खाटांचं 'कोविड' विशेष रुग्णालयाचे काम पूर्ण
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबही...