मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात रविवारी कोरोने २८८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात १०१० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचाः-Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण
राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४७रुग्ण दगावले आहेत. तर १४ आँगस्ट रोजी ४७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १३ आँगस्ट रोजी एकूण ४८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय रविवारी मुंबईत कोरोनाचे १०१० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २८ हजार ७२६ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ७१९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ३४६८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचाः- Gunjan Saxena The Kargil Girl review : 'ती'च्या स्वप्नांची गरुडझेप
राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.
आज निदान झालेले ११,१११ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २८८ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०१० (४७), ठाणे- १६६ (२), ठाणे मनपा-२०६ (६),नवी मुंबई मनपा-३८४ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३५१ (२), उल्हासनगर मनपा-२५ (७), भिवंडी निजामपूर मनपा-३४ (१), मीरा भाईंदर मनपा-१४० (८), पालघर-२३१ (१), वसई-विरार मनपा-१६० (३), रायगड-२४५ (५), पनवेल मनपा-१५३ (१), नाशिक-१६० (२), नाशिक मनपा-४७८ (६), मालेगाव मनपा-४१, अहमदनगर-१९९ (१),अहमदनगर मनपा-९५ (९), धुळे-२४ (७), धुळे मनपा-२९ (२), जळगाव-४६९ (७), जळगाव मनपा-१२९, नंदूरबार-६, पुणे- ६४४ (१२), पुणे मनपा-१५३९ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१९), सोलापूर-१७७ (५), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-१९८ (८), कोल्हापूर-२९५ (२९), कोल्हापूर मनपा-२२३ (७), सांगली-१७४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (९), सिंधुदूर्ग-४, रत्नागिरी-६१ (३), औरंगाबाद-६८ (१),औरंगाबाद मनपा-७२ (३), जालना-७८, हिंगोली-४५, परभणी-२७, परभणी मनपा-४९ (१), लातूर-१२१ (१), लातूर मनपा-११६, उस्मानाबाद-१२७ (२), बीड-८५ (१), नांदेड-५० (३), नांदेड मनपा-१६, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१३ (१), अमरावती-४०, अमरावती मनपा-६४ (२), यवतमाळ-५४, बुलढाणा-५९ (३), वाशिम-२५, नागपूर-१३९ (३), नागपूर मनपा-५५२ (१३), वर्धा-१०, भंडारा-२२ (१), गोंदिया-१४ (१), चंद्रपूर-२४ (१), चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-३, इतर राज्य २० (१).