मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात काल पहिल्यादांच एका दिवसात कोरोना रुग्णांनी १० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज कोरोनाने २५७ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शनिवारी दिवसभरात १०९० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचाः-आयपीएलच्या तारखांची घोषणा, 'या' तारखेला होणार पहिला सामना
मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२ रुग्ण दगावले आहेत. तर २४ जुलै रोजी ५४ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २३ जुलै रोजी एकूण ५५ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शनिवारी मुंबईत कोरोनाचे १०९० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ७९८१ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात ६१७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७८ हजार ८७७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचाः-Ganesh Festival 2020: कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची डागडुजी करा- अशोक चव्हाण
राज्यात आज ७२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख ७ हजार १९४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९२५१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० नमुन्यांपैकी ३ लाख ६६ हजार ३६८ नमुने पॉझिटिव्ह (१९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६५ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २५७ मृत्यू हे मुंबई मनपा-५२, ठाणे-३, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-९,कल्याण-डोंबिवली मनपा-१२, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-२, वसई-विरार मनपा-७, पालघर-२, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-८, धुळे- १, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-४, नंदूरबार-१, पुणे-१७, पुणे मनपा-४५, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर-८, सोलापूर मनपा-४,सातारा-१, कोल्हापूर-७, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-१, सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, बीड-१, नांदेड-३, नांदेड-१, नांदेड मनपा-१, अकोला-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-१,नागपूर मनपा-१, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.