मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १९८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १५११ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचाः-खासगी रुग्णवाहिकांकडून होणारी लूट आता थांबणार, खासगी रुग्णवाहिका शासन ताब्यात घेणार
मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५ रुग्ण दगावले आहेत. तर २७ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १५११ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७९ हजार १४५ इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ९३ हजार रुग्णांनी कोरावार मात केलेली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४४ हजार ७९१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचाः- लालबागचा राजा जनतेसाठी आदर्श, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मंडळाचं कौतुक
राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज २२४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९३ हजार १५४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ९२ हजार ७२३ नमुन्यांपैकी १ लाख ८० हजार २९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.१६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ६९ मृत्यू हे मुंबई मनपा-६, ठाणे मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा- १, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-३, वसई-विरार मनपा-१, धुळे मनपा-१, जळगाव-८, पुणे-४, पुणे मनपा-२३, पिंपरी चिंचवड मनपा-१, सोलापूर मनपा-३, सिंधुदूर्ग-१, जालना-३, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.