Advertisement

घर गाठण्यासाठी 'तो' मुंबई ते उत्तर प्रदेश चालला, विलगीकरण केंद्रात झाला मृत्यू

विना अन्न आणि पाणी त्यांनी १५०० किलोमीटरचा रस्ता कापला.

घर गाठण्यासाठी 'तो' मुंबई ते उत्तर प्रदेश चालला, विलगीकरण केंद्रात झाला मृत्यू
SHARES

लॉकडाऊन दरम्यान मजदूर आणि कामगारांचे अधिक हाल होत आहेत. पालिका आणि काही संस्था कामगार आणि मजदूरांच्या मदतीला पुढे आल्या आहेत. पण अनेक मजदूर आणि कामगारांसाठी ही मदत अपुरी पडत आहे. बरेच मजदूर महाराष्ट्रात अडकले आहेत. मुंबईत अडकलेल्या अनेक कामगारांनी पायीच आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यापैकीच एक होते इंसाफ अली.  पण १५०० किलोमीटर विना अन्न आणि पाण्याचा तो चालला. पण गावातल्या विलगीकरण केंद्रात जाताच त्याचा मृत्यू झाला.  

उत्तर प्रेदशमधल्या श्रावस्ती इथलं घर गाठण्यासाठी इंसाफ अली यांनी १५ दिवसांपूर्वी मुंबई सोडली. सध्या लॉकडाऊन लागू असल्यानं मुंबईहून आपल्या घरी जाण्यासाठी अली यांच्याकडे कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. विना अन्न आणि पाणी त्यांनी १५०० किलोमीटरचा रस्ता कापला.

अखेर सोमवारी ते आपल्या गावच्या वेशीवर पोहचले. त्यांना तातडीनं जिल्ह्यातील मल्हीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मटखानवा इथल्या विलगीकरण केंद्रावर नेण्यात आलं. पण काही तासांनंतरच त्यांचा मृत्यू झाला. पाणी आणि अन्न न मिळाल्यानं ते खूप थकले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

श्रावस्तीचे पोलिस अधीक्षक अनूप कुमार सिंह यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "अली सकाळी सातच्या सुमारास मटखानवा इथं पोहोचले आणि काही चाचण्या घेतल्यानंतर त्यांना स्थानिक शाळेत विलिगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं होतं."

सिंह हे देखील म्हणाले की, "त्यांना योग्य ब्रेकफास्ट देखील देण्यात आला होता. ब्रेकफास्ट केल्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली. परंतु, पाच तासानंतर, त्यांनी पोटातील वरच्या भागात वेदना झाल्याची तक्रार करण्यास सुरुवात केली आणि तीन वेळा उलट्याही केल्या,"

डॉक्टरांना बोलवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मुख्य वैद्यकीय अधिकारी ए.पी. भार्गव यांनी सांगितलं की, "त्यांनी नमुने घेतले आहेत आणि कोरोनव्हायरसच्या चाचणीसाठी घेण्यात आलेले नमुने लखनौच्या डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात पाठवले आहेत."

सीएमओ म्हणाले की, “हा अहवाल आल्यानंतरच आम्ही अलीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करू.” तथापि, ते म्हणाले, डॉक्टरांच्या पथकानं केलेल्या प्राथमिक तपासणी दरम्यान कोरोनाव्हायरसची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणं आढळली नाहीत.

मटखानवाचे गावप्रमुख अजयाराम यांनी सांगितलं की, “अली २४ एप्रिल रोजी श्रावस्तीला पोहोचला होता आणि सुमारे १० किमी अंतरावर आपल्या सासरच्या घरी थांबला होता. सोमवारी ते मटखांवा गावी आपल्या घरासाठी निघाला तेव्हा तो आजारी होता.”

अली यांच्या पश्चात पत्नी सलमा बेगम आणि त्यांना ६ वर्षाचा मुलगा आहे.

Photo Credit - File photo


हेही वाचा

भारताचा चीन कंपन्यांना दणका, Rapid Test Kitsच्या ऑर्डर्स रद्द

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा