Advertisement

रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड प्रकरण कोर्टाकडून बंद

व्यावसायिक कारणांसाठी जमिनीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड प्रकरण कोर्टाकडून बंद
SHARES

शिवसेना नेते रवींद्र वायकर, त्यांची पत्नी मनीषा आणि चार साथीदारांचा समावेश असलेला जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खटला मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने अधिकृतपणे बंद केला आहे. 

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. व्यावसायिक कारणांसाठी जमिनीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. 

मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर यांचा हात असल्याचा आरोप आहे.

मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेलं क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम झाल्याचा आरोप आहे. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या पालिकेच्या जमिनीवर बांधकाम झाल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या जागेवर असलेल्या या 5 स्टार हॉटेलची किंमत 500 कोटींच्या घरात असल्याचादावा भाजप नेत्यांनी केला आहे.

मुंबईतील जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात 13 हजार 674 चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत 500 कोटींच्या घरात आहे. या राखीव भूखंडावर रविंद्र वायकर यांनी 5 स्टार हॉटेल बांधलं असल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महाापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती, असा त्यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी रविंद्र वायकर यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.



हेही वाचा

दक्षिण मुंबईतील रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी लागणार

15 वर्षे जुन्या सरकारी वाहनांची स्क्रॅपिंग होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा