सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दसरा (Dussehra), दिवाळी(Diwali) आणि छटपुजेच्या (Chhat) सणांसाठी 26 अतिरिक्त फेस्टिव्हल(festivals) स्पेशल ट्रेन (special train) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
1. 07196 / 07195 दादर - काझीपेट साप्ताहिक विशेष (10 फेऱ्या)
07196 साप्ताहिक स्पेशल दादर येथून 17.10.2024 ते 28.11.2024 पर्यंत दर गुरुवारी दुपारी 15.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.50 वाजता काझीपेठ येथे पोहोचेल. (5 फेऱ्या)
07195 साप्ताहिक विशेष गाडी 16.10.2024 ते 27.11.2024 पर्यंत दर बुधवारी काझीपेट येथून संध्याकाळी 17.05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 13.25 वाजता दादरला पोहोचेल. (5 फेऱ्या)
गाडीचे थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, रोटागाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बसर, निजामाबाद, आरमर, मेटपल्ली, कोरुटला आणि जगत्याल
2. 07198 / 07197 दादर- काझीपेट साप्ताहिक विशेष – बल्लारशाह मार्गे (16 फेऱ्या)
07198 साप्ताहिक स्पेशल दादरहून 13.10.2024 ते 01.12.2024 पर्यंत दर रविवारी दुपारी 15.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 21.30 वाजता काझीपेटला पोहोचेल. (8 फेऱ्या)
07197 साप्ताहिक विशेष गाडी 12.10.2024 ते 30.11.2024 पर्यंत दर शनिवारी काझीपेट येथून सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि दादरला दुसऱ्या दिवशी दुपारी 13.25 वाजता पोहोचेल. (8 फेऱ्या)
गाडीचे थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, रोटागाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुद्द, कांबळे, वणी, भंडक, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपूर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचिरयाल, पेड्डापल्ली आणि जमिकुंता.
गाडीच्या डब्ब्यांची रचना: दोन AC-2Tier, तीन AC-3Tier, 8 स्लीपर क्लास आणि 4 सामान्य द्वितीय श्रेणी 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी प्रवाशांनी कृपया https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
तसेच मध्य रेल्वे (central railway) प्रशासनाने प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा