कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. अशातच आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदाराचा उपाय म्हणून टोल नाक्यांवर ड्रायव्हर व प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. संशयित कोरोना रुग्णांच्या माहितीसाठी राज्य सरकारनं नवा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळं अनेकांनी कोरोनाची लागण झालेल्या रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्यास त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यातील कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळं या कोरोनाची संसर्ग अधिक वाढू नये यासाठी राज्य सरकारनं राज्यातील टोल नाक्यांवर ड्रायव्हर व प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून यामुळं संशयित कोरोना रुग्णांची माहिती सहज उपलब्ध होईल.
राज्यातील टोल नाक्यांवरून दररोज लाखोंच्या संख्येनं वाहनं ये-जा करतात. त्यामुळं टोल नाक्यांवर ड्रायव्हर व प्रवाशांची नॉर्मल तपासणीकरून चिट्ठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -
Coronavirus Update: म्हणून कोरोना बळीचा अंत्यविधी पत्नी, मुलाशिवाय...
Coronavirus Updates: बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातही विलगीकरण कक्ष