MMRDA मैदानावर दुआ लिपाचे कॉन्सर्ट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी 30 नोव्हेंबर रोजी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) च्या आजूबाजूचे रस्ते बंद केले आहेत. तर काही मार्ग बदलण्यात आले आहेत.
झोमॅटो फीडिंग इंडिया कॉन्सर्ट 2024 मध्ये पॉप सेन्सेशन दुआ लिपा सहभागी होत आहे. हा मुख्य कार्यक्रम कुपोषणाविषयी जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी 1 ते मध्यरात्रीपर्यंत वाहतूक निर्बंध लागू असतील. अनेक प्रमुख मार्ग बंद केले जातील आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहने वळवली जातील. वाहन चालकांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे आणि विलंब टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
वाहनांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलीस संपूर्ण परिसरात तैनात असतील. वाहन चालकांना त्यांच्या दिशानिर्देशांचे पालन करण्यास आणि सुचविलेले पर्यायी मार्ग वापरण्यास प्रोत्साहित केले जाते.
दुआ लिपाची मुंबई भेट
दुआ लिपा गुरुवारी मुंबईत आली आणि नंतर तिचा प्रियकर, ब्रिटीश अभिनेता कॅलम टर्नर याच्यासोबत शहरात डिनर डेटसाठी बाहेर पडली. नवी मुंबईतील 2019 मध्ये वनप्लस म्युझिक फेस्टिव्हलनंतरची ही तिची भारतातील दुसरी भेट आहे.
फीडिंग इंडिया कॉन्सर्ट 2024 मध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे. चाहते दुआच्या या म्युझिक इव्हेंटची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तिचा लाईव्ह कॉन्सर्ट मुंबईत होत आहे.
हेही वाचा