Advertisement

Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या 5 एस्क्प्रेस गाड्या रद्द

खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या 5 एस्क्प्रेस गाड्या रद्द
SHARES

मुंबईत रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे तसेच लोकल ट्रेन आणि विमानसेवा विस्कळीत झाली आहे. मुसळधार पाऊस या आठवड्यात सुरू राहण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ८ जुलै रोजी मुंबईत दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर पाणी साचल्याने सुमारे पाच गाड्या रद्द करण्यात आल्या. विजेच्या गडगडाटासह अजून पाऊस येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पावसामुळे विभागातील विविध स्थानकांवर पाणी साचल्याने सुमारे पाच गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने सोमवारी सकाळी दिली. यापूर्वी बाधित झालेल्या कल्याण ते कसारा दरम्यानची सेवा पूर्ववत झाली आहे.

कोणत्या एस्क्प्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत?

  • 12110 (MMR-CSMT)
  • 11010 (पुणे-CSMT)
  • 12124 (पुणे सीएसएमटी डेक्कन)
  • 11007 (पुणे-सीएसएमटी डेक्कन)
  • 12127 (सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस)

पावसाच्या पाण्याने रुळांवर पाणी साचले त्यामुळे अनेक स्थानकांवर जवळपास तासभर खोळंबा झाला. सेवा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी गाड्या संथ गतीने धावत आहेत. कल्याण ते कसारा दरम्यान गाड्या मर्यादित वेगाने धावत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.



हेही वाचा

मुंबई महानगरातील सकाळच्या सत्रातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा