कळंबोली (kalamboli) येथील मार्बल मार्केटजवळ मोरबे धरणातून निघणाऱ्या मुख्य पाण्याची पाईपलाईनमधून (water pipeline) गळती होत आहे. ही गळती 2042 मिमी व्यासाच्या छिद्रातून होत आहे.
यामुळे नवी मुंबई (navi mumbai) आणि आसपासच्या भागातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे. तसेच नागरिकांना पाणीकपातीचा (water cut)सामना करावा लागणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने (nmmc) तातडीने दुरुस्तीचे कामकरण्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे.
परंतु यामुळे, आज संध्याकाळी नवी मुंबई तसेच खारघर आणि कामोठे सारख्या सिडको भागात पाणीपुरवठा होणार नाही. याव्यतिरिक्त, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने असेल.
नवी मुंबई महानगरपालिकेने रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचे आणि सामान्य पुरवठा पूर्ववत होईपर्यंत अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी, नागरिक नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.