मुंबईतल्या काळाचौकी परिसरातील इस्टल मेटल कंपनीच्या गोदामाला मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर 6 पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या गोदामात केमिकल पदार्थांचा साठा असल्याने आग लागल्यानंतर परिसरात सर्वत्र धुर पसरला असून त्याचा त्रास आसपासच्या नागरिकांना होत आहे.
काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर असलेल्या इस्टल मेटल कंपनीच्या गोदामाला दुपारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीमुळे परिसरात सर्वत्र धुर पसरला आहे. दरम्यान या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.