Advertisement

मुंबईतून हज यात्रेसाठी विमाने वाढवली


मुंबईतून हज यात्रेसाठी विमाने वाढवली
SHARES

मुंबईतून जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी विमानांची संख्या वाढवण्यात अाली अाहे. या अगोदर मुंबईतून हजसाठी १७ विमाने होती. अाता ती वाढवून ५१ करण्यात अाली अाहेत. हज कमिटी ऑफ इंडियाने मुंबई विमानतळावरून विमानांच्या वेळापत्रकातही बदल केला अाहे. मुंबईतून याअगोदर २९ जुलै ते ४ अाॅगस्ट या कालावधीत विमाने जात होती. अाता १२ अाॅगस्टपर्यंत विमाने जातील. हज कमिटी ग्वाल्हेरचे हाजी अब्दुल हक यांनी ही माहिती दिली.
 

देशातून ३५०० यात्रेकरू

हक यांनी म्हटलं की, कोणत्या यात्रेकरूचे कोणते विमान अाणि ते कोणत्या वेळी असेल याची माहिती कमिटीकडून एसएमएसद्वारे दिली जाणार अाहे. पैसे भरण्यासाठी प्रत्येकाला पे- स्लिप सोबत ठेवावी लागणार अाहे. मुंबईतून प्रवाशाचे भाडे कमी होऊन ३० हजार रुपये झाल्याने यावेळी देशातून ३५०० यात्रेकरू हज यात्रेला रवाना होतील. भोपाळमधून फक्त १ विमान २६८ यात्रेकरूंना घेऊन रवाना होईल. 

मक्का येथे १२ हजार प्रवाशांची राहण्याची व्यवस्था करण्यात अाली अाहे. मात्र, ग्रीन श्रेणीमध्ये ३९ हजार यात्रेकरूंनी बुकिंग केलं अाहे. यामुळे १८ हजार यात्रेकरूंना हज कमिटीने अजीजियामध्ये शिफ्ट केले अाहे.


हेही वाचा -

मुंबईकरांना आता रिक्षा टॅक्सी भाडेवाढीचा झटका!

एसी लोकलच्या सर्व फेऱ्या रद्द


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा