Advertisement

कामगार रुग्णालय आगीच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक


कामगार रुग्णालय आगीच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक
SHARES

अंधेरी पूर्वेकडील कामगार रुग्णालया (ESIC)ला आग लागून त्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या १० दिवसांनंतर राज्य सरकारने या आागीची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवां (उद्योग) च्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. ही समिती महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.


कशाची चौकशी करणार?

कामगार रुग्णालयाकडे आॅक्युपेशन सर्टिफिकेटसहित महापालिकेच्या सर्व परवानग्या होत्या का? अग्निशमन नियमांचं पालन करण्यात आलं होतं का? रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत होती का? इत्यादी बाबींची ही समिती चौकशी करणार आहे.


कुणाचा समावेश?

या समितीत इतर ५ सदस्यांमध्ये मुंबई महापालिका आयुक्त, कामगार आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव, आपत्ती प्रतिबंधक विभागाचे संचालक आणि ईएसआयसी आयुक्त यांचा समावेश आहे. तर अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) या समितीचे अध्यक्ष असतील.



हेही वाचा-

कामगार रुग्णालय आग: मृतांची संख्या ११ वर

कामगार रुग्णालयातील आगीप्रकरणी दोघांना अटक, मृत्यूचा आकडा दहावर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा