Advertisement

मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

येत्या २ ते ३ दिवसांत मुंबई, ठाण्यासह पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.

मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
SHARES

मागील अनेक दिवसांपासून पावसानं मुंबईत विश्रांती घेतली आहे. असं असलं तरी येत्या २ ते ३ दिवसांत मुंबई, ठाण्यासह पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या २४ तासांतील माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

७ आणि ८ ऑक्टोबर रोजी विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ९ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. १० ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरु झाला असून, मंगळवारी राजस्थानचा काही भाग, उत्तर प्रदेशाचा काही भाग, मध्य प्रदेशाच्या काही भागासह उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

७ आणि ८ ऑक्टोबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी मुंबईकरांना ऊन्हाचा तडाखा बसत होता. दुपारी किंचित ऊकाड्याचा त्रास झाल्याचे मुंबईकरांना जाणवले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा