Advertisement

मुंबई, ठाणे येथील घरांच्या किमतीत 18 टक्क्यांनी वाढ

2024 या वर्षात मुंबई महानगर क्षेत्रातील घरांच्या किंमतीत तब्बल 18 टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक म्हणजे तब्बलब 49 टक्के वाढ ही दिल्लीतील मालमत्तेच्या किंमतीत झाली आहे.

मुंबई, ठाणे येथील घरांच्या किमतीत 18 टक्क्यांनी वाढ
SHARES

‘मुंबई’ (mumbai) शहरात स्वतःच्या हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु याच शहरात स्वतःचे घर घेणे आव्हानात्मक झाले आहे. तुलनेत 2024 या वर्षात मुंबई महानगर क्षेत्रातील घरांच्या किंमतीत (house rates) तब्बल 18 टक्के वाढ (increase) झाली आहे.

सर्वाधिक म्हणजे तब्बल 49 टक्के वाढ ही दिल्लीतील (delhi) मालमत्तेच्या किंमतीत झाली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ही आकडेवारी प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल अॅन्युअल राऊंडअप 2024’ या अहवालातून समोर आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा