मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना यापुढे मालमत्ता कर भरावा लागणार नाही. राज्य मंत्रिंमडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव मुंबई महापालिकेने मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला. परंतु हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे प्रलंबित होता. अखेर शुक्रवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
यापूर्वी शिवसेना भाजप युतीच्या घोषणेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घरांना मालमत्ता करातून दिलासा देण्याचं आश्वासन दिलं होतं. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
वचनपूर्ती!!!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 8, 2019
मालमत्ता कर मुक्त मुंबईकर!
५०० sq ft पर्यंत असणाऱ्या घरांना आता मालमत्ता कर नाही! शिवसेनेची वचनपूर्ती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार!
Promise Fulfilled! No property tax for homes upto 500 sq ft in Mumbai now! #Mumbai
मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वयंपुनर्विकास धोरणालाही मंजुरी देण्यात आली. तसंच प्रलंबित असलेले एसआरए प्रकल्प आता म्हाडाच्या ताब्यात देण्याचाही निर्णय घेण्यात आला असून रखडलेल्या प्रकल्पातील कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून १० लाख रूपये देण्यात येणार आहेत.
हेही वाचा -
‘या’ दिवशी राहणार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग बंद
Movie Review: लग्नाची बेडी अन् प्रेमाचा फियास्को