कोकण रेल्वे मार्गावर खेड जवळ कशेडी बोगद्यासमोर दरड कोसळल्याने याय मार्गावरील रेल्वे सेवा ही ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही वळवण्यात आल्या आहेत. तब्बल 12 तासांपेक्षा अधिक वेळ प्रवासी रेल्वेत अडकून पडले आहेत. तर अनेकांना खायला देखील मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसापासून कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पवसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
रेल्वे मार्गावरील दरड दूर करण्याचे काम सुरू असून पोकलेन मशीन घटनास्थळी दाखल झाले आहे. रुळावरील ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 8 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर 12 गाड्या या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
रद्द केलेल्या गाड्या
- मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एक्स्प्रेस रद्द
- ट्रेन क्रमांक 10103 मुंबई सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस
- ट्रेन क्रमांक 11003 मुंबई सीएसएमटी-मडगाव तुतारी एक्स्प्रेस
- ट्रेन क्रमांक 12051 मुंबई सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस
- ट्रेन क्रमांक 10105 दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस
गोव्याहून मुंबईहून जाणाऱ्या एक्स्प्रेस रद्द
- ट्रेन क्रमांक 50108 मडगाव-सावंतवाडी पॅसेंजर
- ट्रेन क्रमांक 50108 सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस
- ट्रेन क्रमांक 11004 सावंतवाडी - दादर तुतारी एक्स्प्रेस
- ट्रेन क्रमांक 12134 मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस
'या' गाड्यांचा मार्ग बदलला
- कोकणरेल्वे मार्गाने जाणाऱ्या पाटणा - वास्को दा गामा एक्सप्रेस (12742) ही गाडी मागे वळवून कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मार्गे वळवली जाणार आहे.
- लोकमान्य टिळक (टी) - मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेस (12619) ही एक्स्प्रेस ट्रेन आता रोहा येथे अडकून पडली होती. ती मागे वळवून कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - मार्गे वळवली.
- गांधीधाम- नगरकोइल जंक्शन एक्सप्रेस (16335) ही गाडी विन्हेरे येथे मागे वळवून कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंडा-मार्गे पुढे मडगाव - ठोकूर - मंगळुरुला सोडली.
- लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस (16345) चा प्रवास रविवारी सुरू झाला होता. ही गाडी करंजाडी येथून पाठीमागे जाईल व कल्याण मार्गे वळवण्यात येईल. लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन - एर्नाकुलम.
- पुणे जं. - एर्नाकुलम जं. एक्सप्रेस (22150)आता कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवली जाणार आहे.
- लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस (16345) ही गाडी रविवारी निघाली होती. ही एक्सप्रेस ट्रेन आता कल्याण - लोणावळा - दौंड जंक्शन मार्गे वळवली जाणार आहे.
- गांधीधाम - नागरकोइल एक्सप्रेस (16335) ही ट्रेन कल्याण - लोणावळा - पुणे मार्गे वळवण्यात आली आहे.
- एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम जं. एक्सप्रेस (12284) ही गाडी कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवण्यात आली आहे.
- उधना - मंगळुरू जंक्शन (09057) ही गाडी रविवारी सुरू झाली असून ही गाडी कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवली आहे.
- पटना वास्को द गामा एक्सप्रेस (१२७४२) ही गाडी कल्याण लोणावळा पुणे मिरज लोंडा-मडगाव मार्गे वळवली जाईल.
- लोकमान्य टिळक (टी) मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेस (१२६१९) रोहा येथे सोडण्यात आली असून ती कल्याण- लोणावळा- पुणे- मिरज- लोंडा- मडगाव- ठोकूर मार्गे वळवली जाणार आहे.
कोकण रेल्वेच्या 'या' गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
गाडी क्र. 12133 मुंबई सीएसएमटी- मंगळुरु जं. एक्स्प्रेसचा आज 2 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात येणार आहे. तर ट्रेन क्र. 11003 दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा प्रवास आज वेळापत्रकानुसार 3.5 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात येणार आहे.
हेही वाचा