Advertisement

पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा कोरोना विमा, राज्य सरकारचा निर्णय

अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर सर्व महापालिका तसेच सर्व नगर परिषदा व नगर पंचायती यांना ही योजना लागू राहील.

पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा कोरोना विमा, राज्य सरकारचा निर्णय
SHARES

राज्यातील क व ड वर्ग महापालिका तसंच नगरपंचायती व नगर परिषदा यामधील कोरोना कर्तव्य पार पाडताना मरण पावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा कवच देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर सर्व महापालिका तसेच सर्व नगर परिषदा व नगर पंचायती यांना ही योजना लागू राहील. त्याचप्रमाणे सफाई कर्मचारी, कंत्राटी व मानधन तत्त्चावरील बाह्य़स्त्रोत कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश करण्यात येणार आहे. 

कोरोना कालावधीत आपला जीव धोक्यात घालून महापालिका कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. अनेक ठिकाणी मृतदेहांच्या अंत्यसंस्कारातही या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या संबंधित नगरपालिका आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. जागतिक स्तरावर सेंद्रिय उत्पादनांना असणारी वाढती मागणी त्यांना मिळणारे अधिकचे दर व राज्यातील सेंद्रिय शेतीस अनुकूल असणारी परिस्थितीती विचारात घेता सेंद्रिय शेती उत्पादनास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासाठी उत्पादनास प्रमाणिकरणाची आवश्यकता असते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा