Advertisement

सायकल ट्रॅकच्या कंत्राटात घपला, २१ कोटींचं नुकसान


सायकल ट्रॅकच्या कंत्राटात घपला, २१ कोटींचं नुकसान
SHARES

मुलुंड ते सहार रोड सायकल ट्रॅकच्या प्रत्येक किमीसाठी सुमारे ११ कोटी खर्च करण्यात आल्यानंतर आता जलवाहिनी लगतच्या आणखी १२ कि. मी लांबीच्या सायकल ट्रॅकचं काम हाती घेण्यात येत आहे. मात्र या सायकल ट्रॅकच्या प्रत्येक किमीसाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च केलं जाणार आहे. त्यामुळे या सायकल ट्रॅकच्या आधीच्या आणि आता देण्यात येणाऱ्या कंत्राट कामाची तुलना करता महापालिकेनं यापूर्वी प्रत्येक किमीसाठी सुमारे १.५ कोटी रुपये अधिक मोजल्यानं २१ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची बाब समोर येत आहे.


या ठिकाणी सायकल ट्रॅक

जलवाहिनी लगतच्या मुलुंड ते सहार रोड या १४ किमी लांबीच्या सायकल ट्रॅकचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिल्यानंतर आता घाटकोपर, चेंबूर, शिवडी-परळ आणि वांद्रे ते सांताक्रूझ (पूर्व) आदी भागातील जलवाहिनीलगतच्या मोकळ्या जागांवर सायकल ट्रॅक बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार एकूण १२ किमी लांबीचं सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बांधण्यात येणार आहे.


या कंपनीची निवड

या सायकल ट्रॅकच्या बांधकामासाठी स्काय वे इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला एकूण १२० कोटींचं कंत्राट दिलं असून प्रति किमीसाठी १० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामळे १४ सायकल ट्रॅकसाठी प्रति किमीकरता साडे अकरा कोटी रुपये मोजले होते.

त्या तुलनेत एन विभाग, एम पश्चिम विभाग, एफ/दक्षिण विभाग आणि एच/पूर्व विभाग आदी भागातील १२ किमी लांबीकरता सुमारे १२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये सायकल ट्रॅकसह जॉगिंग ट्रॅक, सेवा रस्ता, वृक्षारोपण, गार्डन, संरक्षण भिंत, पर्जन्य वाहिन्या टाकणे आदींच्या कामांचा समावेश आहे.



मोकळ्या जागेवर सायकल ट्रॅक

मागील कंत्राटदाराने अंदाजित रकमेपेक्षा १२ टक्के दर कमीनं काम मिळवलं होत, तर या कंत्राटदाराने वाटाघाटी करून १.१८ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, १२ टक्के कमी दरात देऊनही आधीच्या 'पी. डी. मुव्हर्स' या कंपनीला प्रति किमीसाठी दीड कोटी रुपये अधिक मोजले गेले.

मुंबईतील मुख्य जलवाहिन्यांलगतच्या दोन्ही बाजुंचं १० मीटर पर्यंतचं अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काढण्यात येत असून या मोकळ्या झालेल्या जागेवर आता सायकल ट्रॅक बनवलं जात आहे.


पहिल्या टप्प्यातील सायकल ट्रॅकच्या बांधकामाला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १२ किलोमीटरच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. त्यातील पात्र कंपनीची निवड करून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.
- अशोक कुमार तावडिया, जलाभियंता 

पहिल्या टप्प्यात भांडुप कॉम्प्लेक्सचा अडीच किलोमीटर लांबीचा पट्टा आहे. या पट्ट्यात जंगली जनावरांचा धोका लक्षात घेऊन तो परिसर ५ मीटर उंचीपर्यंत संरक्षित करण्यात येणार आहे. यामुळे पहिल्या टप्प्यातील कामाचा दर अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं.


  • मुलुंड ते सहार रोड :१४.१० किलोमीटर (कंत्राट: १६१ कोटी रुपये)
  • 'एन', 'एम पश्चिम', 'एफ/दक्षिण'  आणि 'एच /पूर्व' विभाग: १२ किलोमीटर (कंत्राट रक्कम: १२० कोटी रुपये)  
  • मोकळ्या होणारी जलवाहिनी लगतची लांबी: ३६ किलोमीटर

हेही वाचा - 

'सायकल ट्रॅकसाठी महापालिकांना आर्थिक मदत करा' भाजपाची मागणी

खोदा पहाड, निकला... १ किमी सायकल ट्रॅकसाठी ११ कोटींचा खर्च

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा