Advertisement

लॉकडाऊनमुळं परराज्यातील कामगारांची गावी परतण्यासाठी घाई


लॉकडाऊनमुळं परराज्यातील कामगारांची गावी परतण्यासाठी घाई
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढणाऱ्या संख्येमुळे महाराष्ट्रा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल करत आहे. लॉकडाऊन झाल्यास गतवर्षीसारखी वाईट परिस्थिती ओढावू शकते या भीतीनं आता महाराष्ट्रात वास्तव्याला असणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावी परतण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. देशभरातून अनेक मजूर रोजीरोटीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये वास्तव्य करुन आहेत. यापैकी बहुतांश जण असंघटित क्षेत्र किंवा रोजंदारीवर काम करणारे आहेत.

लॉकडाऊन झाल्यास सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प होतील. त्यामुळे या कामगारांची उपासमार होऊ शकते. परिणामी हे सर्व मजूर आणि कामगार सध्या प्रसारमाध्यमांमधील प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहेत. गेल्यावर्षी २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी हातावर पोट असलेल्या मजुरांनी हजारो मैल दूर असणाऱ्या आपल्या गावी पायी चालत जाण्याचा मार्ग पत्करला होता. यामध्ये अनेक मजुरांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचे ढग दाटू लागल्याने हे कामगार सावध झाले आहेत.

फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दिवसाला कोरोनाचे ३० हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ असेल. त्यामुळे अनेक लहान कंपन्यांमधील कामगारांनी गावी परतायला सुरुवात केली आहे.



हेही वाचा -

  1. तेजस एक्स्प्रेस एक महिना राहणार बंद

  1. आता एक्स्प्रेसमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग करण्यावर बंदी
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा