मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकल रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. पावसाच्या या दमदार बॅटिंगमुळे ठिकठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. याशिवाय शहरातील अनेक भागांत पाणी तुंबल्याने रस्ते जाम झाले.
पावसाचे लाइव्ह अपडेट
- मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. बोरिवलीत गाड्या पाण्यात तरंगत होत्या
- 4.07 - सायनमध्ये एका चारचाकी गाडीत वकिलाचा मृतदेह सापडला
- 3.19 - लालबागच्या राजाचे दर्शन 10 मिनिटांत
- 3.15 -खंडाळा बोगद्यात झालेल्या अपघातामुळे वाहतूक धीम्या गतीने
- 3.00 - पालिकेचे 30 हजार कर्मचारी कार्यरत
- 2.30 - फायर ब्रिगेडने 425 जणांना रेल्वेतून बाहेर काढले - आयुक्त
- 2.20 - मुंबईत 23 ठिकाणी 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस -आयुक्त
- 2.18 -मंगळवारच्या मुसळधार पावसात 247 झाडे कोसळली
- 2.15 - हार्बरवरील कुर्ला ते पनवेल दरम्यानची वाहतूक सुरू
- 2.10 - मध्य रेल्वेवरील वाहतूकही सुरू
- 12.46 - एलफिस्टन इथल्या मटकर रोड परिसरातल्या ड्रेनेज लाइनमध्ये पडून एक वृद्ध वाहून गेले
- 12.45 - विले पार्लेत झाड पडून एक जण जखमी
- 12.25 - ट्राफिक अपडेट

- 12.06 - हार्बर रेल्वे पुन्हा विस्कळीत, सीएसएमटी आणि कुर्लामध्ये रेल्वे रूळावर झाड कोसळले
- 11.25 - बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दिपक अमरापूरकर (59) मंगळवारपासून बेपत्ता, लोअर परेल परिसरातून मंगळवारपासून बेपत्ता. परळमधील मॅनहोलमधून वाहून गेले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध सुरू.

- 10.21am-जीएसबी किंग सर्कल गणपतीचे विसर्जन दुपारी 12 वाजता सुरू होईल.
- 10.11am-
- 10.04am- मुंबई एयरपोर्टवर सेवा सुरळीत
- 9.40am- आज सकाळी चर्चगेट, भायखळा, परळ, सीएसटी, वरळी, मुंबई सेंट्रल, दादर, मानखुर्द, चेंबूर, मालाड आणि घाटकोपर येथे अन्न उपलब्ध करून देताना नेवी ऑफिसर
- 9.30am - पहिली सीएसएमटी-पनवेल लोकल हार्बर लाइनवरून 09:03 वाजता सुटली
- 9.26am - घाटकोपर मध्ये पुन्हा पाउस सुरू
- 9.14am - हवामान विभागाच्या मते, पुढील काही तासांसाठी शहरात पाऊस नाही.
- 9.03am - खासगी बस वाहतूकदारांनी टिकटाचे दर वाढवले, दादर ते ठाणे 400 रु., दादर ते नाशिक 1000 रु.
- 8.55am - मुलुंडच्या कित्येक भागात अजुनही पाणी साचून आहे.
- 8.49am - आज डब्बेवाल्यांची सेवा बंद राहणार
- 8.10am - दादर स्टेशन जवळ साफ सफाई करताना रेल्वे कर्मचारी

- 8.06am- घाटकोपर ते मुलुंड ट्रॅफिक सुरळीत
- 8.05am- 7 वाजून 26 मिनिटांनी मध्य रेल्वेवर धावली पहिली लोकल
- 12.46 वाजता - माटुंगाहून डोबिवलीकडे पहिली लोकल रवाना
- 11.58 वाजता - चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना
- 9.56 वाजता - फूड आणि राहण्याची व्यवस्था कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://goo.gl/Qvk3cy
- 9.55 वाजता - नागरिकांना काही समस्या असल्यास 1916 हेल्पलाईनवर संपर्क साधावा
- 9.29 अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल सुरू
- 9.24 वाजता - सीएसटी ते ठाणे रेल्वे सेवा अजूनही ठप्प
- 9.06 वाजता - मुंबईत नद्यांसह परिसरातील पाणी ओसरू लागले
- 9.01 वाजता- दहिसर चेक नाक्यावर 4 किमी लांब जाम
- 8.54 वाजता - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. त्यामुळे अनेक भागांमधील वीजेचा पुरवठा खंडित करण्यात आला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून धारावीसह वडाळा, दादर, परळ तसेच अपोलो मिल कंपाऊंड येथील वीज संग्राह तसेच नेपियन्सी रोडवरील काही भागातील विद्युत पुरवठा खंडित करून तात्पुरता वीज पुरवठा बंद करण्यात आल्याचे बेस्टने सांगितले.
- 8.51 वाजता - ओलाने भाईंदर आणि पवईत सुरू केली फ्रि शटल सेवा
- 8.50 वाजता - प्रो कबड्डी लीगचा सामना रद्द
- 8.48 वाजता - नवी मुंबईतील मोरवे डॅम, मिठी नदी आणि पोईसर नदी दुथडी भरून वाहू लागली
- 8.40 वाजता -
- 8.29 वाजता - पालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द
- 8.21 वाजता - मुंबईत 200 झाडे पडेली आणि 70 शॉट सर्किटच्या घटनांची नोंद
- 8.20 - आपत्तीचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या सहकार्याची गरज - महापौरांचे आवाहन
- 8.12 वाजता- संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 11 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, 7 रेल्वे गाड्या रद्द
- 8.09 वाजता - पालिका मोबाईलवरून एसएमएस पाठवून नागरिकांना देत आहे सद्यस्थितीची माहिती
- 8.08 वाजता- सायन-कोळीवाडा, धारावी आणि डिलाईड रोडच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
- 7.57 वाजता - लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी केली मदद
- 7.51 वाजता - चर्चगेटहून अंधेरीपर्यंतच्या सर्व लोकल रेल्वे गाड्या बंद
- 7.45 वाजता - परीस्थिती सामान्य होईपर्यंत मुंबईतले सर्व टोल नाके आणि सी लिंकवरील टोल वसुली रद्द
- 7.30 वाजता - अंधेरी-विरार वेस्टर्न लाइन सेवा पुन्हा सुरू
- 7.28 वाजता - दादरमध्ये बचाव कार्यासाठी ट्युब बोट तैनात
- 7.21 वाजता - घोडबंदर रोड येथील अविश्वसनीय दृश्य

- 7.19 वाजता- मालाडच्या मालवणीत झाड कोसळले, कोणतीही जीवितहानी नाही
- 7.18 वाजता - मुंबईहून पुणे, नाशिक आणि पनवेलकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द
- 7.17 वाजता - मुंबई बाहेरून मुंबईकडे येणाऱ्या सर्व ट्रेन आहे तिथेच थांबवल्या
- 7.16 वाजता - हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद
- 7.13 वाजता - ठाणे-वाशी रेल्वे सेवा सुरळीत सुरू
- 6.47 वाजता - अंधेरी ते विरार धिम्या मार्गावरील गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवल्या
- 6.46 वाजता - चर्चगेट ते अंधेरी धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू
- 6.40 वाजता -

- 6.27 वाजता - बचावकार्यासाठी पालिकेचे 30 हजार कर्मचारी तैनात
- 6.24 वाजता - 5 पूर नियंत्रण पथक आणि 2 जीवरक्षक पथके शहरात तैनात
- 6.23 वाजता - वडाळ्यात सर्वात जास्त पावसाची नोंद
- 6.22 वाजता - वसई-विरारमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस
- 6.21वाजता - बुधवारी मुंबईतल्या सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी - राज्य सरकारची घोषणा
- 6.18 वाजता- दहिसर नदी धोक्याच्या पातळीवर
- 6.01 वाजता- कुर्ल्यातल्या अनेक भागातील विजपुरवठा खंडित
- 6.00pm- कलिनामध्ये बत्ती गुल
- 5.51 वाजता - मागच्या 12 तासापासून 297.6 मिमी पावसाची नोंद
- 5.33 वाजता - पालिकेच्या वतीने 136 पंपाद्वारे शहरातील पाणी काढण्याचे काम सुरू
- 5.32 वाजता - पालिकेने सर्व गणेश मंडळांना वीज न वापरण्याचे दिले आदेश
- 5.28 वाजता - मुंबई विमानतळ पुन्हा सुरू
- 5.22 - जेट एअरवेजची 7 विमान उड्डाणे रद्द
- 5.20 वाजता - ठाणे आणि कल्याण रेल्वे सेवा सुरू
- 5.15 वाजता- दहिसर, मालवणी, समता नगर, कुरार मध्ये पाणी तुंबले
- 5.14 वाजता - वांद्रे-वरळी सी लिंक पूर्णपणे बंद
- 5.13 वाजता- 2005 नंतर 29 ऑगस्टला सर्वात जोरदार पावसाची नोंद
- 5.12 वाजता- अंधेरी, ठाणे, नाहुर, सायन, कल्याणसह अनेक भागातला विजपुरवठा खंडित
- 5.10 वाजता- मुंबईतले सर्व गुरुद्वारा लंगरसाठी खुले राहणार
- 5.08 वाजता- मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे रद्द
- 5.07 वाजता - मुंबईबाहेर जाणारी रेल्वे वाहतूक रद्द
- 5.06 वाजता- पालिकेने जारी केला हेल्पलाइन नंबर-1916
- 5.05 वाजता - पोलिसांनी जारी केया हेल्पलाइन नंबर-100
- 5.00 वाजता - मुंबईत संध्याकाळी 4.40 वाजता हाईटाईड
- 4.50 वाजता - सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
- 4.40 वाजता - मुंबईतल्या विविध भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एनडीआरएफचे पथक तैनात
- 4:38 वाजता - पावसामुळे विमाने रद्द करण्यात आली
- दुपारी 2 वाजता - महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर केली