Advertisement

ठाण्याच्या पाचपाखाडीत सिलिंडर स्फोट होऊन १ ठार, ४ जण जखमी

मंगळवारी सकाळी पाचपाखडी परिसरातील आंबेडकर रोडवरील एका घरात स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात काकडे कुटुंबातील ५ जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान कांताबाई यांचा मृत्यू झाला.

ठाण्याच्या पाचपाखाडीत सिलिंडर स्फोट होऊन १ ठार, ४ जण जखमी
SHARES

ठाणे पश्चिमेकडील पाचपाखडी परिसरातील एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात १ जण ठार, तर ४ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कांतीबाई वानखेडे (५५) यांचा मृत्यू झाला असून संदीप काकडे (४०), हिंमांशू काकडे (१२), वंदना काकडे (५०) आणि लतिका काकडे (३५) हे चारही जण जखमी झाले आहेत. हे पाचही जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचं समजत आहे.

दुमजली घराचं नुकसान

मंगळवारी सकाळी पाचपाखडी परिसरातील आंबेडकर रोडवरील एका घरात स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात काकडे कुटुंबातील ५ जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान कांताबाई यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सिलिंडरच्या स्फोटामुळं दुमजली घराचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत.

१८ दुचाकी जाळल्या

ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील अल्मेडा रोडवरील हनुमान सोसायटीसमोर उभ्या केलेल्या १८ दुचाकी जाळल्याची घटना देखील मंगळवारी उघडकीस आली. सोमवरी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचं समजतं आहे. आग लागल्याचं कळताच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसंच काही वेळात घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्वरीत ही आग विझवली. मात्र तोपर्यंत १८ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.

हेही वाचा-

भाडेकरू मुलीचं केलं अश्लील चित्रीकरण, गिरगावमधील घरमालकाला अटक

मूल होत नसल्याने मुलीचे अपहरण, २ महिलांना अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा