Advertisement

ठाण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला भीषण आग

ठाणे जिल्ह्यातील मेट्रोरेलच्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली.

ठाण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला भीषण आग
SHARES

वायू आणि ध्वनी प्रदूषण मोजण्याऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) व्हॅननं अचानक पेट घेतली. ठाणे जिल्ह्यातील मेट्रोरेलच्या बांधकामाच्या ठिकाणी शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाची नोंदणी MPCB सोबत काम करणाऱ्या Skylabs Pvt Ltd या खाजगी प्रयोगशाळेकडे करण्यात आली होती.

“मुळात प्रदूषण मोजणारी उपकरणे बसवलेले हे वाहन, मीरा रोडहून ठाण्याकडे जात असताना ही घटना घडली. नागला बंदर सिग्नलवर ते निस्तेज असताना त्यातून धूर येऊ लागला. गाडीला आग लागल्यानं चालक आणि तीन प्रवाशांनी तत्काळ गाडी खाली केली,” ठाणे शहराचे डीसीपी (वाहतूक), बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या वाहनधारकांनी तत्काळ ठाणे अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दल, बचाव वाहन आणि हायड्रा वाहन घटनास्थळी दाखल झाले. गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी तासाभरात आग आटोक्यात आली. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.



हेही वाचा

मानखुर्द परिसरात प्लास्टिक कंपनीला भीषण आग

बेपत्ता पत्नी येताच 'त्यानं' पोलीस स्टेशनमध्येच घेतलं स्वतःला पेटवून

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा