मुंबई महापालिकेकडून मालाड पूर्वसाठी लवकरच स्वतंत्र प्रशासकीय विभाग तयार केला जाण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ही माहिती दिली.
मालाडचा पी उत्तर वॉर्ड हा खूप मोठा प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागात स्वतंत्र प्रशासकीय विभागाची नितांत आवश्यकता आहे. स्वतंत्र प्रशासकीय विभाग तयार करण्यात यावा असं पत्र आमदार अतुल भातखळकर यांनी पालिका आयुक्तांना लिहिलं होतं.
या पत्राला पालिका आयुक्तांनी प्रतिसाद दिला असून या संदर्भात सकारात्मक पावलं त्यांनी उचललं आहेत. पालिका लवकरच मालाड पूर्वसाठी स्वतंत्र प्रशासकीय विभाग तयार करण्याच्या विचारात आहे.
पी उत्तर वॉर्डमध्ये मालाड, मालवणी आणि मालाड पूर्व हे मोठे भाग येतात. प्रभाग मोठा असल्याने बर्याच वेळा या भागातील प्रशासकीय कामे जलद गतीने होत नाहीत. त्यामुळे आमदार अतुल भातखळकर यांनी पालिकेकडे पूर्व मालाड भागासाठी स्वतंत्र प्रशासकीय विभागाची मागणी केली होती.
पोलिस भरतीचा जीआर अवघ्या काही तासात रद्द
MPSC च्या परीक्षा जाहीर; शुक्रवारी तारखा जाहीर होण्याची शक्यता