Advertisement

महापालिका मुख्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण


SHARES

मुंबई - भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 68 वा प्रजासत्ताक दिन महापालिकेत साजरा करण्यात आला. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मुंबई अग्निशन दल आणि महापालिका सुरक्षादलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना महापौर स्नेहल आंबेकर यांनी सार्वभौम लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचा आपण सर्वांनी आदर राखावा आणि लोकशाहीचा हा मजबूत स्तंभ अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान असावे असे सांगितले. भारतीय एकात्मतेची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी घेण्यात आली आहे. ही निश्चितच आपल्या भारत देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे महापौरांनी सांगितले. याप्रसंगी महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त, उपयुक्त, सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा